भारत देशाला आदर्श लोकशाही व्यवस्था लाभली आहे. याच लोकशाही व्यवस्थेतून महाराष्ट्र राज्याच्या १४ व्या विधानसभेत चाळीसगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. चाळीसगाव तालुक्यवासी मायबाप जनतेच्या आशिर्वादामुळे मी आमदार म्हणून तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. खरंतर मला कोणताही राजकीय वारसा लाभलेला नव्हता. वयाच्या ३६ व्या वर्षा मला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी लाभली. त्यामुळे निश्चितच ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची व विश्वासाची होती. आजवर या तालुक्याला लाभलेले नेतृत्व, लोकप्रतिनिधी व बदलती सामाजिक परिस्थिती यामध्ये निश्चितच आपल्याला अधिक सरस कसे राहता येईल, यासाठी कायमच प्रयत्न केला. एकेकाळी धवल क्रांतीमध्ये अव्वल असलेल्या तालुक्याला पुनर्वैभव कसे प्राप्त करून देता येईल. त्याचबरोबर ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा असलेल्या तालुक्याचा लौकिक राज्याभर, देशभभर कसा नेता येईल, यासाठी मन स्वस्थ बसू देत नव्हते.